लग्नात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आल्याने येवतीला वधू पित्यावर गुन्हा दाखल

कोरोना क्राईम बोदवड लॉकडाऊन

प्रतिनिधी बोदवड >> तालुक्यातील येवती येथे रविवारी लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्याने सरपंचांच्या तक्रारीवरून लग्न आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नात डीजे लावून समारंभ सुरू होता. तेथे शंभर ते दीडशे वऱ्हाडी जमले होते. त्यामुळे सरपंच संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून वधूचे वडील भारत बोदडे, भगवान सोनवणे (रा.येवती), विकास झनके, राहुल भारंबे, मिलिंद पाटील (रा.दुधलगाव ता.मलकापूर) आणि जय बजरंग डीजेचे मालक यांच्यासह शंभर ते दीडशे नागरिकांवर कोरोना संसर्ग असूनही जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केल्याने बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.