Source By Google

बोदवड : खडसेंच्या प्रवेशासाठी ५० गाड्यांनी कार्यकर्ते जाणार

Politicalकट्टा कट्टा बोदवड

बोदवड ::> तालुक्यातील ५०० कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. बोदवड तालुक्यात नगरपंचायत, पंस, जिपचे २ सदस्य व अनेक ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे कार्यकर्ते तयारीला लागले आहे. ५० वाहने घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहे.

बुधवारी दुपारी २ वाजता बोदवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर खडसे समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. टप्प्याटप्प्याने भाजपाचे तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष, महिला आघाडीच्या अध्यक्षा राजीनामा देणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांनी सांगितले.