बोदवडला अंगणातून मोटारसायकल लंपास, चोरट्याविरुद्ध गुन्हा

क्राईम चोरी, लंपास बोदवड

बोदवड प्रतिनिधी >> शहरातील मन्यार वाड्यातील मोहम्मद आसिफ शेख मेहबूब यांच्या मालकीची काळ्या रंगाची मोटारसायकल अंगणातून चोरट्यांनी लंपास केली. बुधवारी सकाळी ही बाब समोर आली.

मंगळवारी मोहम्मद आसिफ यांनी कामावरून आल्यावर ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आपल्या राहत्या घरासमोर अंगणात उभी केली. रात्री ९.३० वाजता गाडी अंगणातच लागलेली होती. पण बुधवारी सकाळी ६.३० वाजता उठल्यावर मोटारसायकल जागेवर दिसली नाही. शेख आसिफ यांनी शहरात व तालुक्यातील खेड्यावर दुचाकीचा शोध घेतला. पण तरीही न मिळून आल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.