का साजरा करतात जागतिक छायाचित्रकार दिन…..

ब्लॉगर्स कट्टा

‘छायाचित्र म्हणजे जीवनाचे व्यत्यय असत’ अस कुठेतरी वाचल होत आणि त्याचा प्रत्यय सुद्धा अनेक वेळा आला. खरतर कधी खोलात जाऊन विचार केला तर असंख्य प्रश्न मनात गर्दी करतात. चित्र त्याची छाया म्हणजेच छाया चित्र.. कोणाला सुचलं असावं हे कुठून जन्म घेतात या संकल्पना, बर याची उत्तर मिळाली तरी मग आपला अंदाज बऱ्याचदा लागून झालेला असतो उत्तरापुर्वी. उत्तर कळले की मग आपणच आपल्या माथी हात मारून स्वतःशीच पुटपुटत म्हणतो, ‘आयला इतकं सोपं होतं हे’. म्हणजे होतय काय! आपल्या डोक्यात सगळं असत. परंतु ते प्रासंगिक होत नसत आणि झालंच तर त्याला इत्तेफाक म्हणावा का?
प्रकृतीने प्रत्येक प्राणीला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे ते प्रत्येक वस्तूच्या छवीला आपल्या डोक्यात अंकित करू शकते आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.
तर, आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून १७७ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात.
पूर्वी कॅमेरात टिपलेले छायाचित्र आपल्या हातात यायला 15 ते 20 दिवस लागायचे तंत्रज्ञान विकसित झाले प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आला.
काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले… या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

लेखीका – शितल पाटील, पाचोरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *