जळगावातील २७ भाजप बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी हालचाली सुरु

Featured Jalgaon Nashik Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक रिड जळगाव टीम

रिड जळगाव टीम >> जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत २७ बंडखोर नगरसेवकांमुळे स्पष्ट बहुमताची सत्ता गेल्याची बाब भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून बंडखोर नगरसेवकांना धडा शिकवण्याची जबाबदारी नाशिक भाजप पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

प्रशासकीय पत्रव्यवहारात मातब्बर मानले जाणारे भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आता नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव येत्या दोन दिवसात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन मतदान प्रक्रियेत झालेल्या गोंधळाबाबत उच्च न्यायालयात लक्ष वेधले जाणार असल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे राज्यातील भाजपसाठी संकटमोचक मानले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नाशिक महापालिकेसह उत्तर महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणली. थेट बारामतीवरही चढाई करण्याचा जळगाव मनपातील २७ भाजपचे बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी हालचालीनिर्धार त्यांनी व्यक्त केला होता.

मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचा दबदबा काहीसा कमी झाला. मात्र प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नाशिक महापालिकेतील सलग पाचव्यांदा स्थायी समितीची सत्ता खेचून आणली. अशातच होमपीच असलेल्या जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपमधून २७ नगरसेवक फुटून शिवसेनेच्या गोटात सामील झाले. त्यामुळे फारशी ताकद नसताना शिवसेनेचा महापौर झाला.

ही बाब चांगली जिव्हारी लागल्यामुळे आता जळगावमधील नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाले आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार नगरसेवकांना अपात्र ठरविण्याकरता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन मतदान प्रक्रियेत गोंधळ
जळगाव मनपा निवडणूक आॉनलाईन घेतल्यानंतर त्यात मतदानाच्या वेळी अनेक तांत्रिक गोंधळ झाले. त्यास भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर त्याची दखल घेतली नाही. यात शिवसेनेसह अनेक बंडखोर नगरसेवकांचे मोबाइल व्हिडीओ बंद असूनही त्यांचे मतदान घेण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक अधिकाऱ्यांना फोन केल्याच्या मुद्द्यावरून भाजप उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे.
संदर्भ – दिव्यमराठी