सुशांत आत्महत्या…भाजपचे केवळ मतांचे राजकारण !

Politicalकट्टा महाराष्ट्र

रिड जळगाव टीम ::> सुशांत आत्महत्या प्रकरणावर बाेलताना पाटील म्हणाले की, राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो; परंतु सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य अाहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्याची कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंढेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *