भाजपच्या सोशल मिडिया बॅनरवरून खा. रक्षा खडसेंचा फोटो गायब झाल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> काही दिवसांपूर्वी भाजपा जळगाव जिल्हा कार्यालयातील निखील खडसे यांची फोटोची प्रतिमा काढल्या वरुन झालेला वाद मिटत नाही तोच आता खासदार रक्षा खडसे यांना आगामी आंदोलनाच्या बॅनरवर स्थान नसल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नाथ फाऊंडेशनच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे खा. खडसे यांना पुन्हा एकदा बॅनर स्थान देण्यात आले असले तरी भाजपमधील अंतर्विरोध समोर आल्याचे दिसून येत आहे.

निखिल खडसे हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांच्या पत्नी या भाजपच्या खासदार असतानाही प्रतिमा काढण्यात आल्यामुळे नाथ फाउंडेशन नाराजी व्यक्त केली होती यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या ९ नोव्हेंबर रोजीच्या नियोजित आंदोलनासाठी तयार करण्यात आलेल्या एका बॅनरवर रक्षा खडसे यांना स्थान नसल्याचे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले.

याबाबत सोशल मीडियामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यानंतर काही वेळातच याच बॅनरवर रक्षा खडसे यांचा फोटो असल्याचे दिसून आले पाचोरा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी हे बॅनर सोशल मीडियामध्ये प्रसारित केले होते. दरम्यान, यामुळे आता पुन्हा एकदा प्रतिमांचा खेळ आणि यावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत विरोध दिसून येत आहे.