भाजपा युवा मोर्चा जिल्हा महानगर तर्फे राष्ट्र पुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व भव्य माल्यार्पनाचा कार्यक्रम संपन्न!

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी भूषण जाधव ::> भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भा.ज.पा.जळगाव जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर शुक्रवार रोजी जळगाव शहरातील राष्ट्र पुतळ्यांची स्वच्छता व माल्यार्पनाचा कार्यक्रम तसेच भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या अभियानाचा शुभारंभ सकाळी ८.३० वाजता सेन्ट्रल फुले मार्केट येथील क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व त्या परिसराची स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा), जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या मध्ये जळगाव शहरातील महापुरुष महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी), शाहीर अण्णा भाऊ साठे, संत गाडगे बाबा, महाराणा प्रताप, कवयत्री बहिणाबाई चौधरी ई. राष्ट पुरुषांच्या पुतळ्याचे स्वच्छता करून त्यांना माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सेल्फी विथ खादी हा उपक्रमही राबवण्यात आले.

या प्रसंगी जिल्हापदाधिकारी राजेंद्र घुगे- पाटील, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, मनोज भांडारकर, उज्वला बेंडाळे, महिला अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, राजू मराठे, जितेंद्र मराठे, सचिन पाटील, महेश चौधरी, राहुल वाघ, अनिल जोशी, जयेश भावसार, चंदन महाजन, तसेच युवा मोर्चा पदाधिकारी जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, मिलिंद चौधरी, उपाध्यक्ष राहुल मिस्त्री, रियाज शेख, विनय चौधरी, अश्वीन सैंदाने, प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील, भूषण पाटील, सोशल मिडिया प्रमुख भुषण मनोहर जाधव, कोषाध्यक्ष-ऋषिकेश येवले, मंडल अध्यक्ष बाळू मराठे, जयंत चव्हाण भाजयुमो सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *