खडसे गेल्याने भाजपामध्ये आवागमन अशी स्थिती : माधव भांडारी

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी >> भाजपातून गेलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे गेल्यानंतर भाजपमध्ये आवागमन या शब्दाप्रमाणे स्थिती झाली असून आमच्याकडील काही जण जातील, तर काही समोरचे येतील असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. श्रीराम मंदिरानिमित्त आयोजित टॉक शो साठी जळगावात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी आज जळगावात आले आहेत. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी कारसेवक म्हणून सहभागी झालो होतो. आता याचा मार्ग मोकळा झाला असून आमच्यासाठी हे राष्ट्र मंदिराचे काम आहे. येथे आपण भाजपचे पदाधिकारी म्हणून आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, कृषी कायद्यांना स्थगितीचे काम हे नियमीत न्याय प्रक्रियेचा हिस्सा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भांडारी यांना एकनाथ खडसे यांच्या पक्षातून जाण्याने भाजपवर नेमका काय परिणाम होईल अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, राजकारणात असे होत असते. खडसेंच्या जाण्यामुळे हिंदीतल्या आवागमन या शब्दाप्रमाणे स्थिती होणार आहे. म्हणजे आमच्याकडचे काही जातील, काही समोरचे येतील तर काही गेलेले येतील असे भांडारी म्हणाले.