भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे : एकनाथ खडसे

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव महाराष्ट्र

रिड जळगाव टीम >> काही दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी आज राज्यात शिक्षक व पदवीधर ची निवडणूक झाली असून यामध्ये भाजपाची एकाही ठिकाणी उमेदवार जिंकला नसल्याने खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे > पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे भाजपचा पराभव झाला. एवढेच नव्हे तर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही, अशा शब्दात एकनाथराव खडसेंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

खडसे पुढे म्हणाले की, विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धूर चारली. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे. तर महाविकास आघाडीवर विश्वास आणखी दृढ होताना दिसत आहे. महाविकास आघाडीला एकीचं फळ मिळालं आहे. भाजपमध्ये हम करे सो कायदा होता म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याची खोचक टीका खडसेंनी दिली आहे. चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणत की, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही. आम्ही हिमालयात जाऊन बसू, त्यांच्या नुसत्या गप्पा असतात, अशा शब्दांत खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी भाजपावर टीका करत खिल्ली उडवली आहे. महा आघाडी विकास दिवसेंदिवस राज्यातील जनतेच मन जिंकत चालले आहे. भाजपा राज्यात कमकुवत होताना दिसत आहे.