भाजपात आता लोकशाही राहिलेली नाही : माजी मंत्री एकनाथ खडसे

Politicalकट्टा कट्टा जळगाव

माझा छळ कुणी केला आणि कुणी मला त्रास दिला, याची सर्व माहिती जनतेलाय

जळगाव : आधीच्या कालखंडात आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेत होतो. परंतू आता एकदोन जण निर्णय घेत आहे. पक्षश्रेष्ठींचे समर्थन असल्यामुळे काही जण आम्हीच पक्षाचे मालक असून हुकुमशाहा असल्याप्रमाणे वागताय. आता भाजपात लोकशाही राहिलेली नाही, अशी स्फोटक प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. ते ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. एवढेच नव्हे तर पक्षाच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले. खडसे यांनी कॉंग्रेसकडून मला ऑफर होती आणि भाजपमधील काही आमदारांनी मला क्रॉस मतदान करण्याचे आश्वासन दिले होते. विधानपरिषद निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर नाराज असलेले एकनाथराव खडसे हे पुन्हा आक्रमक झाले आहेत.

खडसे म्हटले की, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांसहा मला विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू अचानक आम्हाला डावलण्यात आले आणि ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, ज्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली, अशांना उमेदवारी देण्यात आली. याच ठिकाणी पक्षाच्या एखादं सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तरी आम्हाला वाईट नसते. परंतू ज्यांचे पक्षासाठी काहीही योगदान नाही, अशा लोकांना संधी दिल्यामुळे संताप होत असल्याचे देखील खडसे म्हणाले.

यावेळी खडसे पुढे म्हटले की, राज्यसभेला तिकीट मिळाले नाही तेव्हा आपली विधानपरिषदेवर वर्णी लावली जाईल, असे सांगण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी शिफारस केली गेली तेव्हाही आम्हा तिघांची नावे होती असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात पक्षाने ज्यांची शिफारस केली नव्हती. अशा गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपचडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आता राजकारण करणे योग्य नाही. पण कोरोनाचा विषय संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करू, असा सूचक इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

दरम्यान, आपण प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करतोय. परंतू दोघांकडून अद्याप संपर्क झालेला नाही. तसेच माझा छळ कुणी केला आणि कुणी मला त्रास दिला, याची सर्व माहिती जनतेला आहे. त्यामुळे मला कुणाचे नाव घेण्याची गरज नाही, असेही खडसे देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्यक्ष नाव न घेता बोलेले.

संदर्भ : livetrendsnews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *