जळगावातून व्यावसायिकाची दुचाकी चोरट्यांनी लांबवली

Jalgaon जळगाव

जळगाव ::> शहरातील गणेश कॉलनीतुन चहाविक्रेत्याची दुचाकी मध्यरात्री दारासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गणेश कॉलनीत राहणारे चहा विक्रेते किरण भगवान पाटील वय-29 हे व्यवसाय करतात. कामधंद्यासाठी त्यांच्याकडे MH 20 DA 1036 क्रमांकाची दुचाकी आहे.

शविवार ३ ऑक्टोंबर रोजी त्यांनी कामावरून आल्यावर राहत्या घरासमोर दुचाकी लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.

किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित पाटील करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *