नागादेवी गावठाण परिसरात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू!

यावल

यावल प्रतिनिधी ::> तालुक्यातील दहिगाव येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नागादेवी गावठाण मध्ये सातपुड्यातून सायंकाळी परत येणाऱ्या गायींवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले असून ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.  नागादेवी गावठाण परिसरात राहणाऱ्या लिलाबाई बारेला या गरीब आदिवासी महिलेची गाय सातपुड्याच्या जंगलात चरावयास गेली होती सायंकाळी पाच वाजता परतीच्या मार्गावर नागादेवी गावठाण लगतच असलेल्या नर्सरीमध्ये बिबट्याने हल्ला केला व जागीच ठार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *