म्हसावद लमांजन परिसरात वीस दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार!

Jalgaon जळगाव

नागरिकांमध्ये घबराट ; वनखात्याकडून बिबट्याचा बंदोबस्त व्हावा नागरिकांची मागणी

म्हसावद :>> म्हसावद येथून पाच किलोमीटर अतंरावरील लमांजन –कु-हाळदा रस्त्यावर आज बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ; लमांजन –कु-हाळदा दरम्यान आज संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.न येथील माजी उप सरपंच शेनफडू नामदेव पाटील यांच्या लमांजन शिवारातील शेतातील कपाशी मधून म्हसावद येथिल शेतकरी निबा ठाकरे (दापोरा फाटा) यांच्या मक्या मध्ये जाताना लमांजन येथील नाना शामराव पाटील यांना दिसला त्यांनी लागलीच लमांजन उप सरपंच गोरख निबा पाटील यांना फोन द्वारे माहिती दिली गोरख यांनी लमांजन येथील पोलीस पाटील भाहुराव आधार पाटील यांना कळविले

वीस दिवसापासून लमांजन परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार
पंधरा दिवसापूर्वी म्हसावद येथील शेतकरी आबा एकनाथ सोनवणे यांच्या सालदारवरती बिबट्याने हल्ला केला होता. तसेच लमांजन येथील भास्कर शामराव पाटील यांची बकरी वरती हल्ला केला यात बकरी जखमी हुन चार दिवसांनी बकरी मयत झाली होती.

आज लमांजन गावाजवळील अर्धा कीलोमीटर अंतरावर शेतकरी निबा ठाकरे यांच्या मक्याच्या शेतात जगली डुक्कर ची शिकार केली असल्याचे लमांजन येथील शेतकऱ्यांन मध्ये चर्चा सुरू आहे. याठिकाणी नागरिकांनकडून फटाके फोडून बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गोरख पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान याबाबत वनखात्याने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा रिड जळगावचे फेसबुक पेज, फॉलो करा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर.

Facebook Instagram Twitter Whatsapp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *