गगनझेप ऊर्जा फाऊंडेशन तर्फे आर्सेनिक अल्बम- ३० गोळ्यांंचे शंभर कुटुंबांना मोफत वाटप

Social कट्टा कट्टा भुसावळ

गिरीश पवार कुऱ्हे पानाचे >>येथील गगनझेप ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश पवार यांच्या कडून रविवार दिनांक ३१ मे रोजी गावातील ज्येष्ठ नागरिक व लहान बालकांना आर्सेनिक अल्बम – ३० या गोळ्या देण्यात आल्या. कोरोनावर अद्याप कुठलीही नाही लस उपलब्ध झाली नसून, आर्सेनिक अल्बम या गोळ्यांमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही या गोळ्यांना मान्यता दिली आहे.


गावातील नागराज वॉर्ड या भागात शंभर कुटुंबांना गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी या गोळ्या देण्यात आल्या. ग्रामीण भागात अजून या गोळ्यांचा पुरवठा झाला नसून, मेडिकल स्टोअर्स मध्ये त्या उपलब्ध नाहीत. म्हणून फाऊंडेशन च्या वतीने पवार यांनी स्वखर्चाने या गोळ्या उपलब्ध करून दिल्या व त्याचे वाटप करून सामाजिक कर्तव्य जोपासण्याचे काम केले आहे. यावेळी गगनझेप ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश पवार, याचे औषध वाटपासाठी सहकार्य लाभले.


कोरोनापासून बचावासाठी औषध Arsenicum album 30 चे फायदे:

सध्या जगभरात कोरोना ची साथ पसरली असून लाखो लोकांना लागण झाली आहे व लाखो मृत्युमुखी पडले आहेत. भारतातही रोग झपाट्याने पसरत असून महाराष्ट्रामध्ये आरोग्याची गंभीर परिस्तिथी निर्माण झालेली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीचे औषध Arsenic album 30 ह्या औषधाची शिफारस केलेली आहे. हे औषध कोरोनाविरुद्ध रोग प्रतिकार शक्ती इतकी वाढवते की कोरोनापासून बचाव होतो.


केरळ तसेच इतर 8 राज्यांनी हेच औषध लाखो लोकांना वाटल्याने ह्या रोगाचा प्रसार थांबला व त्यामुळे कोरोनावर उत्तम रित्या नियंत्रण आणलेले आहे. आपणही हे औषध होमिओपॅथीच्या दुकानातून आणून घरातील लहान वृद्ध सर्वांनी प्रत्येकी 2 गोळ्या रोज एकदा असे 3 दिवस घ्यावे. ह्याने कोरोना पासून संरक्षण मिळण्यासाठी मदत होते. तान्ह्या बाळांना व लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनासुद्धा सुद्धा 2 गोळ्या एकदा असे 3 दिवस हाच डोस आहे. या औषधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसून ब्लड प्रेशर, डायबेटीस इत्यादी आजार असलेल्यांनी त्यांच्या औषधांसोबत बिनधोक पणे घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *