भाजपच्या जि. प. सदस्य पल्लवी सावकारेंचे नाव मतदार यादीतून गायब

Politicalकट्टा कट्टा निवडणूक भुसावळ

भुसावळ >> निंभोरा-पिप्रींसेकम या गटातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. याबाबत सावकारे यांनी प्रांत, तहसीलदारांकडे तक्रार केली. सावकारे गेल्या चार ते पाच वर्षांपासून याच गटात मतदान करतात. मतदारांच्या अंतीम याद्या तयार झाल्या त्यावेळी त्यांचे नाव यादीत होते. मात्र, आता त्यांचे नाव मतदार यादीत नाही. शुक्रवारी मतदानावेळी मतदार यादीत नाव नसल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, असे प्रमोद सावकारे यांनी कळवले.