भुसावळात दागिन्यांसह ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

क्राईम चोरी, लंपास तापी भुसावळ


भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरील राधाकृष्ण अपार्टमेंट येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याच्या दागीन्यांसह रोख रक्कम ३५ हजार रूपयांची मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील सोनल मनोहर पुल्लेवार (वय-३५) रा. शिरपूर कन्हाळा रोडवरील राधाकृष्ण अपार्टमेंट ह्या कामाच्या निमित्ताने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेल्या होत्या.

१२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता परत असल्याने त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसून आला. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले २३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १२ हजार रूपयांची रोकड अशी एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे हे करीत आहे.