शेतात पाणी शिरल्याने काठी व विळ्याने मारहाण ; २ जण जखमी

क्राईम भुसावळ

भुसावळ >> तालुक्यातील वराडसीम येथील रहिवासी लिलाधर रामू भारंबे यांच्या शेतात विश्वनाथ भारंबे यांच्या शेतातील पाणी शिरले. त्याचा जाब विचारल्याने लिलाधर भारंबे व रोहित भारंबे यांनी काठी व विळ्याने मारहाण केली. त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वराडसीम येथील लिलाधर भारंबे यांच्या शेतात शेजारील विश्वनाथ भारंबे यांच्या शेतातील पाणी जात होते. विश्वनाथ भारंबे यांना याचा जाब विचारला. यामुळे वाद होऊन विश्वनाथ भारंबे यांनी लिलाधर भारंबे यांच्या डोक्यात काठीने वार केले. यात लिलाधर भारंबे जखमी होऊन खाली कोसळले. या वेळी तेथे आलेला त्यांचा मुलगा मयूर याचेवर रोहित भारंबे याने विळ्याने वार केला. यात मयूर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहे. लिलाधर आणि मयूर यांना प्रत्येकी दहा टाके पडले. लिलाधर भारंबे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ भारंबे व रोहित भारंबे यांचेवर गुन्हा दाखल झाला.