भुसावळ शिंदी गावाजवळ आढळला बोदवडच्या शिक्षकाचा मृतदेह

क्राईम बोदवड भुसावळ यावल

भुसावळ >> बोदवड येथील न.ह.रांका हायस्कूल मधील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक रुबाब इब्राहिम तडवी (वय ५२) हे मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील शिंदी गावाजवळ मृतावस्थेत आढळले.

कोरपावली (ता.यावल) येथील रुबाब तडवी (ह.मु. फालक नगर, भुसावळ) हे रांका हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यांनी मंगळवारी सुटी घेतली होती. रात्री बोदवड रस्त्यावरील शिंदी गावापासून एक किमी अंतरावर ते पडलेले आढळले.

पोलिस पाटलांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. यास तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दुजोरा दिला.