भुसावळ >> परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात भुसावळ आगारातील कर्मचारी देखील सहभागी झाले होते. यापैकी २७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. पैकी १४ जणांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

इतर १३ कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी (दि.२७) महामंडळाच्या विभागीय कार्यालयात बोलावले आहे.

महामंडळाचे कर्मचारी ८ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर आहे. राज्य शासनाच्या सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी त्यांचा लढा आहे.

मात्र, हा संप अवैध असल्याचे सांगत महामंडळाने आतापर्यंत भुसावळ आगारातील २७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

त्यात सुरुवातीला निलंबित केलेल्या १४ जणांना बाजू मांडण्यासाठी जळगाव येथे विभागीय कार्यालयात बोलावले होते.

मात्र, एकही कर्मचारी त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी गेला नाही. परिणामी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली.
यानंतर १३ निलंबित कर्मचाऱ्यांना देखील त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी विभागीय कार्यालयात बोलावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *