अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला!

क्राईम भुसावळ

भुसावळ रिपोर्टर ::> तालुक्यातील सिंधी, खडका आणि सुनसगाव येथील तलाठी महिला अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाळूचा ट्रक पकडल्याची घटना आज दुपारी नहाटा चौफुली ते खडका चौफुली दरम्यान घडली. ट्रक मालकास तब्बल अडीच लाखाचा दंड आकारण्यात आला असून या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सिंधी गावाच्या तलाठी साधना खुळे, खडका तलाठी मनीषा गायकवाड आणि सुनसगावच्या तलाठी जयश्री पाटील यांचे पथक गस्त घालत नहाटा चौफुलीवर उभे होते.

याचवेळी अवैध वाळू नेतांना ट्रक क्रमांक एमएच १९ जे ०१५० तेथून जात होता. संबंधित महिला अधिकाऱ्यांनी ट्रक चालकास थांबण्याची सूचना केली. परंतू चालकाने ट्रक पळवायला लागला. त्यानंतर तिघंही महिला अधिकाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली.

थोड्याच अंतरावर असलेल्या गणपती मार्बल जवळ ट्रकला पकडण्यात महसूलच्या अधिकाऱ्यांना यश आले. ट्रकमध्ये साधारण २ ब्रास वाळू होती. ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून तब्बल २ लाख ४१ हजाराचा दंड आकारण्यात आला. कारवाईच्या वृत्ताला मंडळ अधिकारी बी.एन. शिरसाठ यांनी दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *