भुसावळात १ लाख ८९ हजारांत महिलांची फसवणूक

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी  ::> कर्जाची मागणी करणाऱ्या महिलांची १ लाख ८९ हजारांत फसवणूक झाल्याची घटना १५ ऑगस्ट ते २५ सप्टेंबर या काळात घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

आपणास कर्ज पाहिजे आहे का? अशी जाहिरात वृत्तपत्रात आली होती. या जाहिरातीमधील मोबाइल क्रमांकावर शहरातील काही महिलांनी संपर्क साधला. यावेळी त्यांना कर्ज सुरक्षा पॉलिसीच्या नावे तुम्हाला सहा महिला एकत्र करून गट तयार करावा लागेल. यानंतर लघुउद्योग, व्यवसायासाठी १ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज सुलभतेने दिले जाईल. मात्र, त्यासाठी आधी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार महिलांनी १ लाख ८९ हजार रुपये संबंधिताच्या बँक खात्यात जमा केले.


यानंतरही कर्ज न मिळाल्याने महिलांनी संबंधितांना संपर्क केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची भेट घेतली. यानंतर विशाखा सुनील शिंदे (रा.गडकरी नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *