मुंबई ते प्रयागराज दोन विशेष दुरंतो रेल्वे गाड्या धावणार

भुसावळ सिटी न्यूज

भुसावळ ::> रेल्वेतर्फे मुंबई ते प्रयागराज दरम्यान दोन दुरंतो विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते प्रयागराज दरम्यान या गाड्या धावतील.

२ ऑक्टोबरपासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवार व शुक्रवारी सायंकाळी ५.२५ वाजता दुरंतो विशेष गाडी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. तर दुरंतो स्पेशल प्रयागराज येथून दर मंगळवार आणि शनिवारी तीन ऑक्टोबर पासून सायंकाळी ७.२० वाजता सुटेल.

दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रातून उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिमेकडे गुजरात राज्यात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. मात्र, राज्यातील दैनंदिन प्रवास अजूनही सुरू झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *