भुसावळ : >> शहरातील जाम मोहल्ला भागात माजी नगरसेवकाच्या ताब्यातील घरात सुरु असलेल्या जुगारावर बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली होती. त्यात पकडलेल्या १६ जुगारींवर गुन्हा दाखल झाला.
माजी नगरसेवक सलीम खान तस्लीम खान यांच्या घरात शनिवारी मध्यरात्री जुगार खेळताना माजी नगरसेवक सलीम खान यांच्यासह वसीमखान सलीम खान, कादरखान सिकंदरखान, जामील खान फिरोज खान, शेख मुक्तार शे. गफ्फार, शब्बीर आली, नूर मोहम्मद सोहेल, मेहमूद खाटीक, बाबरखान अन्वर खान, राहीस शहिद बागवान, शामिजबी उल्लाखाण, शे. रशीद शे. हुसेन आदींना ताब्यात घेण्यात आले.