भुसावळात छेडखानी प्रकरणी शेगाव येथील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम भुसावळ

भुसावळ ::> वरणगाव रोडवरील रहिवासी असलेल्या महिलेची छेड काढल्याने, शेगाव येथील संशयिताविरुद्ध बाजारपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. संबंधित महिला आणि तिचा पती यांच्या वाद झाले होते. त्यामुळे संशयित कैलास श्रीराम सुलताने (रा.शेगाव) याने मध्यस्थी केली होती. संशयित या महिलेस वारंवार फोन करून विचारपूस करत होता. मंगळवारी (दि.२२) रात्री ९ ते १० दरम्यान, संशयित महिलेच्या घरी आला, तसेच त्याने विनयभंग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *