१९ दिवसांनी भुसावळ पुन्हा हादरले ; खडका रोडवर चाकूने भोसकून युवकाचा खून!

क्राईम भुसावळ

प्रतिनिधी ::> भुसावळ शहरातील बाबला हॉटेल परिसरातील रहिवासी १९ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना, खडका रोडवरील निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. २५ ऑगस्टला श्रीरामनगरानगरात अभियंता युवकाची गोळीबारात हत्या झाली होती. त्यानंतर १९ दिवसांच्या अंतरात पुन्हा खुनाच्या घटनेचे भुसावळ शहर हादरले.

अल्लमस शेख रशीद असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर अज्ञात संशयितांनी चाकूने चार ते पाच वार केले. जखमीला त्याच्या मित्राने शहरातील मानवतकर हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती कळताच डीवायएसपी गजानन राठोड यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले. तर काही पोलिस अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तत्काळ या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *