निर्माती एकता कपूरला भुसावळातून बजावली कायदेशीर नोटीस

Entertainment ऑनलाईन-बिनलाइन भुसावळ

भुसावळ ::> बालाजी प्रोडक्शन निर्मित वेब सिरीज ‘वर्जिन भास्कर २’मध्ये मुलींच्या एका होस्टेलमध्ये बेकायदेशीर कृत्ये चित्रित केली आहेत. या होस्टेलवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव असल्याने धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

त्यामुळे निर्माती एकता कपूर यांनी धनगर समाजाची जाहीर माफी मागावी, तसेच सदरची दृष्ये वेब सिरीजमधून काढून टाकावे, अन्यथा प्रोडक्शन परवाना रद्द करावा या आशयाची नोटीस भुसावळ येथील धनगर समाज उन्नती मंडळाचे माजी संस्थापक अध्यक्ष पितांबर न्हाळदे, बंडू हडपे यांनी ॲड. सत्‍यनारायण पाल यांच्यामार्फत एकता कपूर यांना पाठवली आहे. या प्रकरणी कपूर यांच्याकडून येणाऱ्या खुलाशाकडे लक्ष लागले आहे. कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे भुसावळकरांचे याकडे लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *