भुसावळ प्रतिनिधी :>> कुऱ्हे पानाचे बुधवारी (दि. २६) झालेल्या चाचणी शिबिरात भिलमळीतील २५ जणांनी स्वॅब दिले होते. त्यापैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने भिलमळीच्या पोलिस पाटलांना कळवली, मात्र रुग्णांची नावे जाहीर न केल्याने गोंधळ उडाला होता. नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात येऊन तीन रुग्णांची नावे जाहीर केली, त्यानंतर गोंधळ मिटला. पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. |
