भुसावळ : >> शनिवारी तालुक्यात तीस कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यात गरुड प्लॉट, विठ्ठल मंदिर वार्ड, गांधी नगर, वकील गल्ली, कन्हेयालाल प्लॉट, बारा बंगला, रेल्वे कॉलनी तसेचग्रामीण भागात निंभोरा, वराडसीम, दर्यापूर, साकरी, खडका येथे प्रत्येकी एक, वरणगाव दोन, रुग्ण आढळले. उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली. यामुळे शहरातील मृतांची संख्या ८४ झाली.
