भुसावळ शहरात बंद घरातून सात लाखांचा मुद्देमाल लंपास!

क्राईम भुसावळ

शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवीनगरात झाली चोरी

रिड जळगाव टीम ::> लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावी अडकून पडलेल्या कुटुबियांच्या घराच्या दरवाजाचा कोडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास केला. शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवीनगरात ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

लॉकडाउन काळात २० मार्चपासून फिर्यादी प्रतिमा महेंद्र मगरे (वय ४८, रा. वैष्णवीनगर, सिद्धी विनायक आय.टी.आयजवळ शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. सोमवारी त्या आपल्या घरी पर आल्या, त्यावेळी दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ बाजारपेठ पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. डीवायएसपी गजानन राठोड, प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहायक निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील यांनी पाहणी केली.

असा मुद्देमाल लांबवला…घरातील साडेतीन लाख रुपये रोख, १२ तोळे सोन्याचे दागिने, टीव्ही, एसी असा ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ही घटना २० मार्च ते १४ सप्टेंबरदरम्यान घडली. सोमवारी ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *