मोकाट गुरांमुळे वाढले दररोज किरकोळ अपघात

भुसावळ

रिड जळगाव टीम ::> भुसावळ शहराच्या सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या जामनेररोडवरील अष्टभुजा देवी मंदिराजवळ मोकाट गुरांचा त्रास वाढला आहे. रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे नेहमीच लहानमोठे अपघात घडत आहेत. पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गुरांच्या मालकांचे फावले आहे. गुरांना पकडून पांझरापोळमध्ये पाठवणे, गुरांच्या मालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *