प्रतिनिधी चोपडा >> श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक भिडे गुरुजी यांचा मार्गदर्शन मेळावा रविवारी चोपडा शहरात झाला. मेळाव्यात कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने आयोजकांसह ३०० ते ४०० जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चोपडा येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात अनेक जण विना मास्क होते. तर याच मेळाव्यात फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन झालेले दिसले नाही.

मेळावा बंदीस्त जागेत त्याचप्रमाणे क्षमतेपेक्षा जास्त जनसमुदाय असल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादी नुसार जिग्नेश शरद कंखरे, विजय भास्कर वैदकर, गणेश पंढरीनाथ बाविस्कर, विठ्ठल शालिक महाजन, समाधान माळी, महेंद्र भामरे, शुभम महाजन, गोविंदा माळी, नंदू गवळी, हर्षल माळी (सर्व रा. चोपडा) व आयोजकांसह जवळपास तीनशे ते चारशे जणांवर चोपडा येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *