भडगाव तालुक्यातील शिवणीतील ७१ वर्षीय वृध्दाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

क्राईम भडगाव

भडगाव : > तालुक्यातील शिवणी येथील रहिवाशी असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला २०० रुपये देतो असे अमीष दाखवुन जबरदस्तीने आरोपी रहात असलेल्या घरात घेऊन जाऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला असून पिडीत मुलीच्या आईने आरोपी हरसिंग हिलाल पाटील वय-७१ रा. शिवणी ता.भडगांव यांच्या विरुद्ध बलात्कार केल्याची फिर्याद दिल्याने भडगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी पिडीत मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे दि.२५/५ /रोजी दुपारी २ वाजेपुर्वी आरोपी हरसिंग हिलाल पाटील याने अल्पवयीन मुलीस २०० रुपये देतो असे अमीष दाखवुन शिवणी येथील आरोपीच्या रहात्या घरात घेऊन जाऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिल्याने आरोपी विरुद्ध भादंवि कलम 376,354,511 प्रमाणे
तसेच पिडीत मुलगी अल्पवयीन व अनु.जमाती ची असल्याने पोस्को व अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास डि.वाय.एस.पी कैलास गावंडे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *