विहिरीत पडल्याने भडगाव जुवार्डी येथील तरुणाचा मृत्यू

अपघात आत्महत्या क्राईम भडगाव

भडगाव >> तालुक्यातील जुवार्डी शिवारातील विहिरीत पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेनंतर घडली. संतोष सुरेश अहिरे (रा.जुवर्डी) असे मृताचे नाव आहे. त्याचा जुवार्डी शिवारातील स्वत:च्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची खबर चिंतामण पाटील यांनी भडगाव पोलिसात दिली. त्यानुसार घटनेची नोंद झाली. तपास पोलिस नाईक नीलेश ब्राह्मणकर हे करत आहेत.