चारित्र्यावर संशय घेऊन चौघांची विवाहितेस मारहाण ; धमकी देत केला विनयभंग!

अमळनेर क्राईम निषेध पाेलिस सिटी न्यूज

तू शेतीत हिस्सा मागू नको. अन्यथा तुला ठार करू जेठाकडून विवाहित महिलेला धमकी

अमळनेर प्रतिनिधी >> शेतीचा वाटा का मागते? अशी विचारणा करत ठार मारण्याची धमकी देत आणि महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन जेठ, जेठनी, पुतणी व जेठणीच्या मैत्रिणीने मारहाण व विनयभंग केला. ही घटना ३० नोव्हेंबरला तालुक्यातील बहादरवाडी येथे घडली.

बहादरवाडी येथील रहिवासी विवाहितेचे पती चालक आहेत. अनेकवेळा ते कामानिमित्त बाहेरगावी असतात. त्यामुळे ३० नोव्हेंबरला विवाहिता आपल्या मुलासह अमळनेरहून बाजार करून उशिरा सायंकाळी घरी परतली. यावेळी त्यांची शेती करणारे जेठ राघो मगन पाटील, जेठाणी वैशाली राघो पाटील व पुतणी दामिनी पाटील व जेठाणीची मैत्रीण कविता देविदास पाटील या चौघांनी विवाहितेला तू उशिरा का आली? असे विचारणा केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला.

तसेच तू शेतीत हिस्सा मागू नको. अन्यथा तुला ठार करू, अशी धमकी देत मारहाण देखील केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून विनयभंग व रस्ता अडवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. अमळनेर पोलिस तपास करत आहेत.