यावल ग्रामीण रुग्णालय

बामणोदच्या २१ वर्षीय तरुणास सर्पदंश ; प्रकृती बिघडल्याने गोदावरीत केले दाखल

फैजपूर यावल

फैजपूर प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील बामणोद येथे एका २१ वर्षीय तरुणाला शेतात काम करताना असतांना सर्पदंश झाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यास जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अविनाश गोकुळ सोनवणे असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अविनाश बुधवारी सकाळी शेतात कामाला गेला होता. शेतात काम करत असताना अचानक त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. ते लक्षात येताच त्यास तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, परिचारिका नेपाली भोळे, सुमन राऊत आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यास जळगाव येथील शासकीय महाविद्यालयाच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले