Yawal News : यावल तालुक्यात 12 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू…

यावल सिटी न्यूज

यावल > तालुक्यातील सावखेडा येथील 12 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवार, 16 रोजी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. विजया प्रल्हाद कोळी (12, सावखेडासीम) असे मयत बालिकेचे नाव आहे. मयत मुलीचे वडील प्रल्हाद पुरुषोत्तम कोळी यांनी यावल पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरावरील पत्र्यांवर ठेवलेल्या शेंगा काढण्यास गेल्यानंतर तिला सर्पदंश झाला व तत्काळ मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तत्पूर्वीच तिची प्राणज्योत मावळली. मयत विजयाच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परीवार आहे.

यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
दहिगावच्या आदर्श विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणार्‍या विजयाच्या मृत्यूने सावखेडा गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. मृत विजयाच्या कुटुंबाची परीस्थितीत नाजूक असल्याने या कुटुंबाला शासनाने अर्थसहाय्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली सिकंदर तडवी व सहकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *