भाजपाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत ; त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का ? खा. इम्तियाज जलील

Politicalकट्टा कट्टा निषेध महाराष्ट्र

औरंगाबाद ::> शहरात एमआयएमच्या वतीने उत्तरप्रदेशातील हाथरस गावातील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी एमआयएम खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी भारतीय जनता पार्टीवर व योगी सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी ते म्हणाले, उत्तरप्रदेश हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भाजपाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?”, असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *