औरंगाबाद रस्त्याचे एका बाजूचे काम पूर्ण ; वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांना दिलासा

Jalgaon जळगाव महाराष्ट्र

रिड जळगाव टीम पहूर ::> जळगाव ते औरंगाबाद महामार्गाचे फर्दापुरपर्यंतच्या टप्प्याचे एका बाजूने काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचा अपवाद वगळता विमानतळ ते फर्दापूरपर्यंतचा रस्ता एका बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

तब्बल तीन वर्षापासून रखडलेल्या जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम करणारी आंध्रप्रदेशातील कंत्राटदार कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर रस्त्याचे काम बंद पडले आणि तक्रारी वाढल्या होत्या. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत तक्रारी गेल्यानंतर गेल्या वर्षी या महामार्गाच्या कामासाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोंबर २०१९ पासून महामार्गाच्या कामाने वेग घेतला होता.

फर्दापूर ते जळगावपर्यंतच्या टप्प्याचे काम जून २०२० ची डेडलाईन ठेऊन कामाला वेग देण्यात आला होता. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत विमानतळापर्यंतचे एका बाजूने कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर वाकोद-नेरीपर्यंतच्या टप्प्यात दोन्ही बाजूने कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ऑक्टोंबर महिन्यात विमानतळ ते कुसुंबा आणि पुढे डिसेंबरपर्यंत एमआयडीसीपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिलासादायक : वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर
ऐन पावसाळ्यात उमाळे ते विमानतळ या टप्प्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काम पूर्ण झाल्याने औरंगाबाद जाणाऱ्या महामंडळाच्या बसेस व खाजगी वाहतूकदारांना देखील दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *