महिलांनो.. अन्यायाविरुद्ध पेटून उठा…!

कट्टा ब्लॉगर्स कट्टा


राज देवरे रिड जळगाव टीम ::> महिलांची सुरक्षा हा आता आपल्या समाजात एक ज्वलंत विषय झाला आहे एकट्या महिलेने रात्री-अपरात्री बाहेर पडणे म्हणजे कठीण झाले आहे, सध्याच्या काळात टी.व्ही. वर्तमानपत्र वर दररोज बलात्काराची विनयभंगाची बातमी असतेच असते हे सर्व बघत असताना आपल्याला सर्व यंत्रणा विषयी मनात चीड निर्माण होते या सर्व गुन्हेगारांसाठी काही कायदा आहे की नाही ? असा मनात प्रश्न निर्माण होतो.

2012 साली दिल्लीत घडलेली निर्भया घटना राजस्थान मधील एका दलित महिलेला विवस्त्र करून गावातून धिंड काढलेली घटना 2016 साली महाराष्ट्रात घडलेली कोपर्डी घटना 2019 गेल्या वर्षी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील डॉक्टर मुलीची घटना तर आत्ताच उत्तर प्रदेश मधीला हाथरसची घटना अशा एक ना अनेक घडलेल्या घटना वर्तमानपत्रातील बातमी वाचली अंगावर शहारा येतो.

त्यात एकतर्फी प्रेमाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे ॲसिड हल्ल्यात एक छोटसं उदा. – एका महाविद्यालयाची विद्यार्थिनी हुशार अभ्यासात रमलेली कधी कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारी तिच्या महाविद्यालयातील एका मुलाला ती फार आवडायची तो तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करायचा पण तिला त्या गोष्टीची आवड नव्हती तरीही तिला अडवू लागला, चिठ्ठ्या पाठवू लागला हा सर्व प्रकरणाने ती घाबरली होती घरी सांगण्याची हिंमत झाली नाही अचानक शेवटी तो काळ आलाच एक दिवशी सकाळी त्यामुलाने त्या मुलीचा रस्ता अडवला आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. आणि सर्व आयुष्य अंधारमय झालं जर तिने घरी सांगितलं असतं तर या सर्वत्र गोष्टी विरुद्ध आवाज उठवला असता तर ती घटना घडलीच नसती अन्यायाविरुद्ध पेटून उठली असती तर स्वतःचा जीव तरी वाचला असता.

एखाद्या स्त्रीला अशी वागणूक दिली जाते आणि कायदा काहीच करत नाही का? या घाणेरड्या कृतीला आळा बसावा आज आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत महिला पुरुषांच्या बरोबर काम करतात मग ते कोणतेही क्षेत्र असो महिला मागे नाही हे वाक्य आपल्या तोंडी पाठ झाली आहे तरीही महिला स्वतंत्र झाल्या पण त्यात सुरक्षित झाल्या का ? आज अनेक चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कार्यालय मध्ये महिला कार्यरत आहेत मग जर महिला सक्षम झाल्या असे आपण म्हणतो तर त्या गप्प का बसतात ? याविषयीच्या आवाज का उठवत नाही हा प्रश्नही आपल्या मनात नक्कीच येतोच या सर्व प्रकारासाठी काही कायदे आहेत ना मग त्याची त्यांना माहिती नाही का ? आपल्याला होण्याऱ्या अन्यायाला घाबरून जाऊ नका पैसा आज नाही मिळवता आला तरी चालेल पण एकदा अब्रु गेली की ती परत मिळवता येत नाही एवढ मात्र नक्की
म्हणून अन्यायाविरुद्ध पेटून उठा..!🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *