सोनार महामंडळ होणारच!!!!!

कट्टा ब्लॉगर्स कट्टा

एकीकडे आपण श्रीमंत असल्याचं भासवायचं पण दुसरीकडे उर्वरीत सोनार समाज परिस्थितीशी झगडतोय !!!

जय नरहरी ……
नमस्कार मित्रांनो माझ नाव हर्षल सोनार आहे मी आज आपल्या समोर ,सोनार समाजाची सद्याची स्थिती काय यावर भाष्य करणार आहे.


सोनार म्हणजे श्रीमंती , आर्थिकदृष्ट्या सदन समाज, सोनार म्हणजे पैश्यावाला प्रगत समाज अस समीकरण गेल्या पिढ्यान पिढ्या आपण ऐकत आलो पण आजपर्यंत आपण याच आभासी श्रीमंतीच्या ढोंगामुळे आज इतर समाजांच्या तुलनेत मागे फेकलो गेलोत. असतील आपल्या समाजात श्रीमंत लोक पण प्रत्येक सोनार श्रीमंत हा समज अत्यंत चुकीचा आहे आज जर आपण परिस्थिती पाहिली तर आपणास समाजातील आपला सोनार बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगतांना दिसेल. म्हणजे एकीकडे आपण श्रीमंत असल्याचं भासवायचं पण दुसरीकडे उर्वरीत सोनार समाज परिस्थितीशी झगडतोय !!!


याच आपल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल बांधवाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तरच आपला सोनार समाज खरा उन्नत समाज होईल यासाठी आपण वैयक्तित तर मदत करू शकतो पण संपूर्ण आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाज बांधवाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपणास एक शाश्वत उपाय करावा लागेल.तो असा कि आपण महाराष्ट्र शासन दरबारी सोनार समाजातील दुर्बल घटकांसाठी “स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ उभारावे याला सोनार समाजाचे आराध्य दैवत संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळ असे नाव देण्यात यावे ज्याद्वारे आपणास आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत होईल व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात हातभार लागेल आणि जेव्हा समाजाचा विकास होईल तेव्हा आपोआपच आपला विकास होईल.


या सोनार समाजाच्या महामंडळासाठी मी लढा उभारला आहे.आपला देखील पांठींबा या महान समाज कार्यात आपण मला साथ द्याल अशी आशा बाळगतो.सोनार महामंडळासाठी जे येतील त्यांचा सोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय मी लढा चालवेल.पण आता माघार नाही.”सोनार महामंडळ होणारच!!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *