यंदा त्रिपुरारी पौर्णिमेस अंतूर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर राहणार बंद

Social कट्टा अमळनेर कट्टा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टीनचा निर्णय

अमळनेर >> दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेस भाविकांसाठी खुले असणारे अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्तांनी घेतला आहे.दरवर्षी अंतुर्ली येथील कार्तिक स्वामींचा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडत असतो.मात्र, यंदा कोरोना मुळे भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमा दि. २९ रोजी आहे.

दरम्यान,कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेची संभाव्य परिस्थिती पाहता खबरदारी, शासनास मदत व गर्दी होवून संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून दि. २८ ते ३० या कालावधीत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे, असे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व विश्वस्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

गजानन पाटील अमळनेर