भुसावळ ::> महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.
शहरातील ममता सनांसे (रा. पूजा कॉम्प्लेक्समागील सदगुरू हौसींग सोसायटी) यांना अनिल चौधरी यांच्यात गाळे विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यापोटी महिलेने ६० लाख ७० हजार रूपये आरटीजीएसद्वारे चौधरी यांना दिले. गाळा विकणारे चौधरी व गाळा घेणारे सनांसे हे निंबंधक कार्यालयात गेले होते. मात्र कार्यालयातील तांत्रिक अडचणीमुळे विलंब लागणार असल्याने, चौधरी प्रचारासाठी निघून गेले. नंतर चौधरी यांच्याकडून फसवणूक झाल्यामुळे सनांसे यांनी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज दिला. त्याची चौकशी करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिल्यावर अनिल चौधरी यांनी महिलेस २७ ऑक्टोबरला धमकी दिली.