आमदारांच्या मध्यस्थीने मिटवलेल्या लाच प्रकरणाची चौकशी होणार

Jalgaon जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> जिल्हा परिषदेच्या तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून बदलीसाठी घेतलेली लाच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मध्यस्थीने परत केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात लाच घेतल्याचे उघड झाल्याने रवींद्र शिंदे यांनी शिक्षण संचालकांकडे तक्रार केली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी दिले.

चाळीसगाव तालुक्यातील तीन शिक्षकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपयांची लाच घेऊन त्यांची बदली अपेक्षित ठिकाणी न केल्याने संबंधित शिक्षकांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणात आमदार चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक आणि सीईओ डॉ.बी.एन. पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम परत केली होती. या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी रवींद्र हिंमतराव शिंदे यांनी केली होती. त्यामुळे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी ३० रोजी सीईओंना पत्र दिले. या पत्रात सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *