अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीची आज होणार निवड

Politicalकट्टा अमळनेर कट्टा निवडणूक

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> अमळनेर पंचायत समितीच्या सभापती रेखा नाटेश्वर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे.

निवडणुकीस पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ राहतील. त्यांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्य करतील. ही जागा जनरल महिला राखीव असल्याने यात महिलांमध्ये चुरस रंगणार आहे.

यात भाजपचे ५ सदस्य तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. सध्या पंसवर भाजपच्या सभापती होत्या. पंस सदस्य म्हणून त्रिवेणीबाई पाटील, रेखाबाई पाटील, कविता पवार, भिकेश पाटील तर राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल आणि विनोद जाधव हे तीन जण आहेत.

त्रिवेनाबाई पाटील व कविता पवार यांच्यात सभापतीपदासाठी चुरस असून दोघांपैकी कुणाची सभापतीपदी वर्णी लागते? याकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे सदस्य काय भूमिका घेतात? यावर ही सभापतीपद महत्वाचे आहे.

कविता पवार की त्रिवेणाबाई?
सभापतीपद कविता पवार यांना की त्रिवेनाबाई पाटील यांना मिळणार याबाबत अद्याप भाजपकडून नावाची घोषणा झालेली नाही. आमदार स्मिता वाघ या कुणाचे नाव सुचवतात, त्यावर सभापतिपद अवलंबून असेल. दोन्ही महिलांकडून दावा केला जात आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये पेच आहे. तर राष्ट्रवादी या वेळी नेमके कुणाकडून बाजू घेते, हे देखील तितकेच महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान, अद्याप राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने स सभापती पदाचे नाव अधांतरी असल्याने उत्सुकता वाढली आहे.

१४ महिन्यांना कार्यकाळ
सभापती निवडणूक झाल्यावर प्रथम एस. टी. प्रवर्गाच्या भाजपच्या वजाबाई भील या विजयी झाल्या होत्या. तर अडीच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर रेखाबाई पाटील बिनविरोध सभापती झाल्या होत्या. आता मात्र त्रिवेणाबाई पाटील व कविता पवार या दोन्ही महिला प्रबळ दावेदार आहेत. आता १४ महिन्यांसाठी सभापती पदाचा कालावधी राहणार असल्याने चुरस आहे.