अमळनेरात सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांची कडक कारवाई!

अमळनेर क्राईम

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> सध्याला सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर 103 केसेस व 37 हजार दंड आकारण्यात आले आहे. यात विनापरवाना, बिना मास्क म्हणून येणे अशा कारवाई करण्यात आल्या आहेत. सदरचे पथकाने सहाय्यक पोलिस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अंबादास मोरे व त्यांचे पथक सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगिर, एकनाथ ढोबळे, पोलीस उपनिरिक्षक गणेश सूर्यवंशी व राहुल लबडे तसेच कर्मचारी पोलीस नाईक डॉ.शरद पाटील, पोह संजय पाटील, पोना दिपक माळी, रवी पाटील, हितेश चिंचोरे, ललित पाटील, अमळनेर बस डेपोचे ड्रायव्हर किरण धनगर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *