क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे ; विविध सामाजिक संघटनांचे नगरपरिषदेकडे निवेदन

Social कट्टा कट्टा

अमळनेर प्रतिनिधी >> अमळनेर शहरातील मुख्य चौक असलेल्या पन्नालाल चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृती स्मारक उभे करावे अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा सह विविध सामाजिक संघटनांनी नुकतीच नगरपालिकेकडे केलेली आहे.


अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदिप गायकवाड यांची बहुजन क्रांती मोर्चा चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,प्रा विजय गाडे,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भीमराव महाजन,जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद निकम, प्रा जितेंद्र संदानशिव,यांचेसह अनेक शाहू,फुले,आंबेडकरी सामाजिक चळवळीतील जेष्ठ व युवा कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची भेट घेत अमळनेर शहरातील पन्नालाल चौकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मृती स्मारक नगरपरिषदेच्या माध्यमातून उभे रहावे अशी मागणी केली आहे.शहरात अनेक महापुरुषांची स्मारकं विविध चौकात तयार करण्यात आलेली असून महात्मा ज्योतिबा फ़ुले यांचे स्मारकाच्या विषयाकडे दुर्लक्ष न करता प्राधान्याने नगराधक्षा व नगरसेवक यांनी महत्व द्यावे अशी अपेक्षा सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली आहे.


क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृती स्मारकाच्या विषयावर लवकरच नगरपालिका सत्ताधारी गटाचे पालिकनेतृत्व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल व सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवक यांनाही बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने सर्व संघटनांच्या प्रतिनिधीसह भेटून निवेदन देण्यात येणार आहे.निवेदनावर कमलाकर संदानशिव,गौतम बिऱ्हाडे,पत्रकार अजय भामरे,अरविंद बिऱ्हाडे,ए एम मोरे,समाधान बिऱ्हाडे,राजरत्न रामराजे,प्रमोद बिऱ्हाडे,गौरव सोनवणे,अजय बिऱ्हाडे, अक्षय सोनवणे, खैरनार,सतिश सोनवणे आदींच्या स्वाक्षरी आहेत.


यापूर्वीच महाराष्ट्र माळी महासंघ, कांच माळी समाज पंच मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद , अमळनेर,संत सावता माळी सेवा मंडळ,संत सावता माळी मित्र मंडळ,क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,नगरसेविका रत्नमाला साखरलाल माळी, नगरसेवक भाऊसाहेब महाजन आदींसह अनेक आजी माजी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही फुले दाम्पत्याच्या स्मारकाची मागणी केलेली आहे.
गजानन पाटील अमळनेर✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *