अमळनेर तालुक्यात विजेच्या खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू

अमळनेर क्राईम

रजनीकांत पाटील अमळनेर प्रतिनिधी :> कळमसरे सब स्टेशन अंतर्गत असलेल्या बोहरा गावठाण व जंगल सर्किट च्या विद्युत वाहिन्यांच्या झुकलेल्या सिमेंटच्या स्तंभांचे सरळीकरण करत असताना एका 29 वर्ष तरुण वायरमनचा दुर्दैवी अंत झाला तर या घटनेची माहिती कळमसरे विद्युत उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता अंकित गावंडे यांनी यासंदर्भात मारवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मृत राकेश साळुंके घरून सकाळी कामावर हजर असताना सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दोराची गाठ सोडत असताना त्याचा तोल गेल्याने खांबावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

यावेळी सहकाऱ्यांनी तात्काळ अमळनेर येथे नर्मदा फाउंडेशन उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टर अनिल शिंदे यांनी राकेश साळुंखे ला मृत घोषित केले. या संदर्भातील पुढील तपास मारवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहे. मृत राकेश साळुंखे मारवड येथील असून त्याच्या पश्चात विधवा आई व बहीण आहे. तर बारामती येथे विज तंत्रज्ञ म्हणून कामाचा अनुभव घेत असताना कळमसरे उपकेंद्र अंतर्गत एकलहरे व एक तास या गावासाठी त्याची नेमणूक झालेली होती. मृत राकेश चा साखरपुडा झाला होता मात्र लॉकडाऊनमुळे विवाह लांबणीवर गेला होता तरी या घटनेने कळमसरे मारवड परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *