अमळनेरच्या शैलजित शिंदे या मुलीने आदिवासी बालकांना वुलनच्या टोप्या-मिठाई देऊन वाढदिवस केला साजरा

Social कट्टा अमळनेर कट्टा

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील ::> जन्मदिवसाच्या निमित्ताने कु शैलजित शिंदे या मुलीने आदिवासी बालकांना थंडीपासून बचाव करणाऱ्या वूलंन टोप्या व मिठाई वाटून जन्मदिवस साजरा केला.

येथिल शहराबाहेर असलेल्या मोकळया जागेतील शांताबाई नगर मधिल आदिवासी मागासवर्गीय गरीब मुलांमध्ये जाऊन सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून लहान मुलामुलींचे डोकं नाक कान चेहऱ्याचा बचाव करणाऱ्या वुलन च्या टोप्या भेट देऊन बालकांचे तोंड गोड करीत आनंदाने स्वतःचा वाढदिवस साजरा करत कु शैलजित रणजित शिंदे हिने सालाबादप्रमाणे याहीवेळी वेगळा आदर्श घालून दिला आहे.आपला प्रत्येक वाढदिवस हा गोर गरिबांना मदत करीत साजरा करण्याची परंपरा कु. शैलजित सातत्याने जोपासत आहे. यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, गिरीश देवकर, वरद देवकर व स्थानिक माता पालक उपस्थित होते.