अमळनेरात बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्राची चोरी

अमळनेर क्राईम चोरी, लंपास

अमळनेर प्रतिनिधी >> बसमध्ये चढताना एका महिलेचे १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकात घडली.

सुरेखा बबन पाटील या टाकरखेडा जाण्यासाठी बुधवारी सकाळी दोंडाईचा ते जळगाव बस (एमएच- १४, बीटी- १३२५)मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाचे १५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे प्रवाशांमध्ये विशेषत: महिला प्रवाशांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.